प्रयोगशाळेतील गैरव्यवहारांवर अॅपची नजर

मुंबई महापालिकेच्या अद्ययावत लॅबचा अॅप लवकरच
प्रयोगशाळेतील गैरव्यवहारांवर अॅपची नजर
Published on

अहवालात फेरफार, पैसे भरण्यात गैरव्यवहार, एकूण वरळी येथील मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेतील कारभार पूर्णतः पारदर्शक होणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने अॅप विकसित केला आहे. या अॅपमुळे तेथील काही कर्मचारी व कंत्राटदार यांच्यात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना आळा बसणार आहे. हा अॅप लवकरच लाँच करण्यात येणार आहे.

वरळी येथे मुंबई महापालिकेची टेस्टिंग लॅब असून, या लॅबमध्ये रस्ते मटेरियल, पाणी, पूल संदर्भातील साहित्य अशा १०० हून अधिक तपासणी होतात. तपासणीसाठी संबंधित कंत्राटदार प्रयोगशाळेत जाऊन नमुने तपासणीसाठी देतात. सध्या प्रयोगशाळेत मॅन्युअली काम होत असल्याने तपासणी अहवालात काही गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक अॅप विकसित केला असून, वस्तू देण्यापासून पैसे देणे अहवालप्राप्त करणे या सगळ्या गोष्टी अॅपद्वारे करणे शक्य होणार आहे. या अॅपमुळे लॅबमध्ये चालणारे गैरव्यवहार बंद होतील आणि मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

रस्ते कामांसह अन्य कामे दर्जेदार होणार!

"वरळी येथील प्रयोगशाळेत रस्ते साहित्य, पुलाच्या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य, केमिकल, रसायने अशा विविध १०० हून अधिक साहित्यांची तपासणी होते. या अॅपमुळे तपासणी अहवाल योग्य येईल, तसेच व्यवहारात गैरप्रकार घडणार नाही. कंत्राटदार अथवा संबंधित जी काही पेमेंट ऑनलाईन करू शकणार आहे. कंत्राटदाराने किती पैसे भरले, तपासणी अहवाल काय हे मुंबई महापालिकेच्या संबंधित अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अॅपवर कधीही पाहता येणार आहे. या अॅपमुळे गैरव्यवहारांना आळा बसेल आणि मुंबईकरांना दर्जेदार सुविधा मिळतील."

- अजित कुंभार, सह आयुक्त, दक्षता विभाग, मुंबई महापालिका

logo
marathi.freepressjournal.in