Maharashtra Bhushan : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस (Maharashtra Bhushan) यांनी केले शिक्कामोर्तब, आज मुख्यमंत्र्यांनी घेतली रेवदंडा येथे आप्पासाहेबांची भेट
@MahaDGIPR
@MahaDGIPR

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan) पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र (Maharashtra) सरकारकडून आज 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज शिक्कामोर्तब केले. तसेच, रेवदंडा येथे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेटही घेतली.

ते गेली ३० वर्ष निरूपण करत आहेत. तसेच, अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आहेत. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही त्यांनी केलेले आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. या संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले असून वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात. ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री किताबाने सन्मानित डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in