मुंबईत पहिल्यावहिल्या 'ॲपल' स्टोअरचे उदघाटन; काय म्हणाले सीईओ टीम कूक?

'ॲपल' कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्या हस्ते झाले भारतातील पहिल्यावहिल्या 'ॲपल' स्टोअरचे उदघाटन, मुंबईत पहिले 'ॲपल' स्टोअर
मुंबईत पहिल्यावहिल्या 'ॲपल' स्टोअरचे उदघाटन; काय म्हणाले सीईओ टीम कूक?

जगातील मोबाईल कंपन्यांमधील सर्वात मोठी कंपनी 'ॲपल'ने भारतातील पहिल्यावाहिल्या 'ॲपल' स्टोअरचे उदघाटन केले आहे. यासाठी स्वतः 'ॲपल'चे सीईओ टीम कुक हे भारतात दाखल झाले असून त्यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आले. १७ मार्चला ते भारतामध्ये दाखल झाले असून त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली होती.

'ॲपल'चे सीईओ टीम कुक यांनी ट्विट केले की, "मुंबईतील ऊर्जा, सर्जनशीलता आणि उत्कंठावर्धक वातावरण अविश्वसनीय आहे. आम्ही मुंबईतील बीकेसीमध्ये 'ॲपल'चे पहिल्या स्टोअरचे उदघाटन करण्यास उत्सुक आहोत." असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, काल सीईओ कूक यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी व टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. तसेच, त्यांनी बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षितची देखील त्यांनी भेट घेतली. तिच्यासोबत त्यांनी मुंबईच्या वडापावचा आस्वाद घेतला. २० एप्रिलला ते दिल्ली येथे दुसऱ्या 'ॲपल' स्टोअरचे उदघाटन करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in