अजय चौधरी गटनेतेपदी, नियुक्तीला उपाध्यक्षांची मान्यता

आता शिंदेगट विरूद्द शिवसेना, अशी कायदेशीर लढाई रंगणार आहे.
 विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ
Published on

शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. यामुळे शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांचा चौधरी यांच्या निवडीवरील आक्षेप निकाली निघाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार अजय चौधरी यांची निवड केल्याचे पत्र उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात आले होते. त्यांनी या निवडीला मान्यता दिल्याचे पत्र महाराष्ट्र विधिमंडळाच्या अवर सचिवांकडून जारी करण्यात आले आहे. यामुळे आता शिंदेगट विरूद्द शिवसेना, अशी कायदेशीर लढाई रंगणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in