कुत्र्यांवर नियंत्रणासाठी ॲनिमल वेल्फेअर कमिटी नेमा; हायकोर्टाचे पालिकेला निर्देश

कांदिवली येथील हाऊसिंग सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांद्वारे चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनांकडे लक्ष वेधत सोसायटीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
कुत्र्यांवर नियंत्रणासाठी ॲनिमल वेल्फेअर कमिटी नेमा; हायकोर्टाचे पालिकेला निर्देश
Published on

मुंबई : कांदिवली येथील हाऊसिंग सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांद्वारे चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनांकडे लक्ष वेधत सोसायटीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सोसायटीच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करताना न्यायालयाने पालिकेला ॲनिमल वेल्फेअर कमिटीफ नेमण्याचे निर्देश दिले. कुत्रे आक्रमक आहेत की नाही, याचे मूल्यांकन न्यायालय करू शकत नाही, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.

कांदिवली येथील आरएनए रॉयल पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीफने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने सोसायटीतील रहिवासी असलेल्या प्राणीप्रेमींकडून कुत्र्यांना खायला घातले जात आहे. त्यामुळे भटके कुत्रेही सोसायटीच्या आवारात येऊन ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा चावा घेत आहेत, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. याला प्राणीप्रेमी पारोमिता पुथरण यांच्या वतीने जोरदार आक्षेप घेतला.

कुत्र्यांच्या आक्रमकतेबाबत आम्ही मूल्यांकन करू शकत नाही

दोन्ही युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कुत्र्यांच्या आक्रमकतेबाबत आम्ही मूल्यांकन करू शकत नाही, असे स्पष्ट केले आणि सोसायटीतील भटक्या कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटना रोखण्यासाठी ॲनिमल वेल्फेअर कमिटी नेमण्याचे निर्देश पालिकेला दिले. कमिटीने प्राणीप्रेमी आणि सोसायटीतील रहिवाशांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही खंडपीठाने स्पष्ट करत याचिका निकाली काढली.

logo
marathi.freepressjournal.in