शिवाजी पार्क मैदानाच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक

मुसळधार पाऊस आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचा फसलेला प्रकल्प यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शिवाजी पार्क मैदान पाण्याखाली गेले
शिवाजी पार्क मैदानाच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक
Published on

शिवाजी पार्क मैदानाची दुरुस्ती करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पावसाळ्यानंतर मैदानाची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागातील अधिकाऱ्याने दिली. मुसळधार पाऊस आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचा फसलेला प्रकल्प यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शिवाजी पार्क मैदान पाण्याखाली गेले.

१५ ते २० जुलै दरम्यान मुंबईत बेफाम पाऊस कोसळला. या पावसात शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. संपूर्ण मैदानात चिखल झाला. पावसाळा वगळता इतर महिन्यात मैदानात मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यावर पर्याय म्हणून धूळ उडणे थांबवण्यासह मैदानात हिरवळ फुलवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प पालिकेने गेल्या वर्षी उभारला. यासोबतच मैदान समतल करण्यासाठी सुमारे ४०० ते ५०० ट्रक माती टाकण्यात आली होती. मैदानात मधोमध खडी, मुरूम, विटांचे तुकडे यांचा रस्ता बनवण्यात आला होता. यंदाच्या पावसाळ्यात मैदान पाण्याखाली गेल्याने शिवाजी पार्कचे रहिवासी आणि राजकीय पक्षांनी पालिकेवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर एकूणच शिवाजी पार्क सुशोभीकरण प्रकल्पाचा फेरआढावा पालिकेने घेण्यासह तज्ज्ञ समितीची नेमणूक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in