महाराष्ट्राच्या नवीन धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती

१९८८ रोजी जामनेर कोर्ट येथे सिव्हिल व क्रिमिनल या विषयात वकिली व्यवसाय सुरू केला
महाराष्ट्राच्या नवीन धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती

महाराष्ट्राचे नवीन धर्मादाय आयुक्त म्हणून महेंद्र महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे कार्यालय वरळी येथे आहे. महाजन यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जामनेर येथून पूर्ण करून, त्यांचा वकिली अभ्यासक्रम एस. एस. मणियार लॉ कॉलेज जळगाव येथून पूर्ण केला.

त्यानंतर त्यांनी १९८८ रोजी जामनेर कोर्ट येथे सिव्हिल व क्रिमिनल या विषयात वकिली व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांची ११ फेब्रुवारी, १९९७ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. सरकारी वकील म्हणून वाशिम, धुळे येथे २००६पर्यंत त्यांनी काम केले. त्यानंतर २ मे, २००६ रोजी त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती चंद्रपूर येथे झाली. त्यानंतर त्यांनी नांदेड येथेही जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले. त्यानंतर मुंबई येथे कामगार न्यायालय, सिटी सिव्हिल सेशन कोर्ट, मुंबई येथील विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. त्याचप्रमाणे बुलढाणा नागपूर मुंबई हायकोर्ट येथे काम केल्यानंतर त्यांच्या कामाचा दांडगा अनुभव बघून महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त म्हणून केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in