पश्चिम रेल्वेतील महिलांच्या २११ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला मंजुरी

आपत्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅक यंत्रणा
पश्चिम रेल्वेतील महिलांच्या २११ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला मंजुरी

गु्न्हेगारीला आळा घालण्यासाठी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय पश्चिम आणि मध्य रेल्वेने घेतला आहे. मात्र सध्या ही सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या लोकलमधील महिलांच्या २११ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर मध्य रेल्वेकडून ११४ लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

उपनगरीय रेल्वे मार्गावर वाढत्या प्रवासी संख्येसोबत गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे वाढते गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस प्रयत्न करत असले तरी हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुन्ह्यांचा तपस जलद गतीने लागण्यासाठी महिलांच्या डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे तसेच महिला प्रवासी प्रवास करत असताना आपत्कालीन परिस्थिती ओढवली अथवा महिला कोणत्या संकटात असताना त्याबाबत मोटरमनना तात्काळ माहिती मिळावी म्हणून डब्यात टॉकबँक यंत्रणा बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. कोरोनकाळात हा प्रकल्प काहीसा रखडला. मात्र सद्यस्थितीत याचे गांभीर्य ओळखत रेल्वे प्रशासनाने प्रकल्प राबवण्याच्या हालचाली सुरु केल्या हेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी पश्चिम रेल्वेला १२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पश्चिम रेल्वेवर प्रकल्पला सर्वाधिक वेग

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या ९३ लोकल असून यापैकी ७ लोकल या एसी लोकल आहेत. विना एसी लोकलमधील महिलांच्या १२९ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर महिलांच्या २९ डब्यांमध्ये आणि ७० सामान्य डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात आली असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. दरम्यान, महिलांच्या उर्वरित २११ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी मिळाल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. तर महिलांच्या आणि सामान्य (जनरल) एक हजार ११६ डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणा बसवण्याचे कामही प्रगतीपथावर असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. तर

मध्य रेल्वेनेही या प्रकल्पाला गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या असून सध्या ४२ लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिलांच्या ५२ डब्यांमध्ये पॅनिक बटण यंत्रणा आहे. ११४ लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in