मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या मरीन अॅक्वा झूमधून प्राणी चोरीला गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरीला गेलेल्या प्राणांमध्ये सहा अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरड्याचा समावेश आहे. जे प्राणी चोरीला गेले आहेत ते सगळे परदेशी प्रजातीचे आहेत. झूमधील कथित अनधिकृत बांधकामावर बीएमसीने सोमवारी तोडक कारवाई केली होती. झूमधील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेलेत. प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
प्राणी संग्रहालयाच्या शेजारी असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावांत मगरीच पिल्लू सापडल्यानंतर प्राणी संग्रहालय अधिक चर्चेत आलं होतं. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे. चोरी झालेल्या प्राण्यांची किंमत सुमारे साडेचार लाख इतकी असल्याचं बोललं जातं आहे.
मुंबईतील मारिन अॅक्वा झूमध्ये आता ससा, कोकेटेल, मलार्ड डक्स, कार्पेट पायथन 14 फूट वाढतो, बॉल पायथन 6 फूट वाढतो, अर्जेंटिना टाग्यू घोरपड, ब्ल्यू टंग स्किंग ( साप सुरळी), एम्पेरोर विंचू, इग्वाना, बंगाल मार्बल मांजर, रेड आयड स्लायडर कासव हे प्राणी आणि पक्षी तसेच अलिगेटर गार, अरोवना, फ्लॉवर हॉर्न, परोट फिश, पिराना, angel's, हे मासे या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत.