तांत्रिक कारणामुळे जलवाहिनी दुरुस्ती लांबणीवर ;मेट्रोच्या कामात अंधेरीत जलवाहिनी फुटली

या सर्व तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत रविवारी, ३ डिसेंबरला सकाळी पूर्ण होणे शक्य झाले नाही.
तांत्रिक कारणामुळे जलवाहिनी दुरुस्ती लांबणीवर ;मेट्रोच्या कामात अंधेरीत जलवाहिनी फुटली

मुंबई : मुंबई मेट्रो प्रकल्पाचे ड्रिलिगचे काम सुरू असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ १८०० मी मी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी फुटली; मात्र जल वाहिनी दुरुस्तीच्या कामात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने रविवार रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. काण पूर्ण झाल्यावर घाटकोपर, कुर्ला, अंधेरी पूर्व व पश्चिमेला लवकर पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली.

मुंबई मेट्रो प्रकल्पाचे ड्रिलिंग काम सुरू असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ १८०० मी मी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी फुटली होती. महानगरपालिकेने गळती दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले. तर शनिवार २ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून ते रविवार, ३ डिसेंबरपर्यंत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत दुरूस्‍ती काम सुरू रहाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र, या दुरुस्ती कामास तांत्रिक आव्हानामुळे अपेक्षेपेक्षा अधिकचा कालावधी लागत आहे.

अडथळ्यांमुळे दुरुस्तीवर परिणाम

प्रकल्प स्थळावरील अडथळ्यांमुळे दुरुस्ती कामाच्या गतीवर परिणाम होतो आहे. तसेच, नादुरुस्त जलवाहिनी ही खूप खोलीवर असून, त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हानी पोहोचली आहे. जलवाहिनीमधील पाण्याच्या दाबामुळे पूर्णपणे जलवाहिनी रिकामी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करावा लागत आहे. जलवाहिनी जवळ असणाऱ्या लूज मातीमुळे काम करताना अडथळे निर्माण होत आहेत. या सर्व तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत रविवारी, ३ डिसेंबरला सकाळी पूर्ण होणे शक्य झाले नाही.

logo
marathi.freepressjournal.in