इंडिया आघाडीच्या 'मी पण गांधी' रॅलीत पोलीस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची ; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

जमावबंदीचे आदेश लागू असल्याचं सांगत पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.
इंडिया आघाडीच्या 'मी पण गांधी' रॅलीत पोलीस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची ; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

आज गांधी जयंतीच्या निमित्ताने मुंबईत इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी इंडिया आघाडीचे समर्थक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे पोलिसांकडून काँग्रेस कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यातआलं. यानंतर कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले. यामुळे जमावबंदीचे आदेश लागू असल्याचं सांगत पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, इंडिया आघाडीच्या पदयात्रेसाठी वर्षा गायकवाड सचिन अहिर उपस्थित होते. मात्र पोलिस आणि कार्यकर्ते यांच्या बाचाबाची झाल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंडिया आघाडीच्या वतिने 'मी पण गांधी' पदयात्रा काढण्यात आली होती.

ही पदयात्रा मेट्रो सिनेमा - पॅशन ट्रीट - हुतात्मा चौक - महात्मा गांधी मार्ग - बाळासाहेब ठाकरे पुतळा - रिगल सिनेमा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - जारीव गांधी पुतळा - मंत्रालयाजवळीत महत्वा गांधी यांचा पुतळा या मार्गाने जाणार होती. महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ इंडिया आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक महात्मा गांधी आणि लालबाहदुर शास्त्री यांच्या स्मृतींना वंदन करणार होते.

मात्र, पोलिसांनी रिगल सिनेमा येथून रॅली सुरु करा, असं सांगितलं. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आणि गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in