अपघात टाळण्यासाठी भटक्या जनावरांना अटकाव ;रेल्वे रूळांवर फिरणारी ४१७ मोकाट जनावरे जप्त

रेल्वे रूळांवर किंवा रेल्वेच्या हद्दीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोकाट फिरणारी जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येते.
अपघात टाळण्यासाठी भटक्या जनावरांना अटकाव ;रेल्वे रूळांवर फिरणारी ४१७ मोकाट जनावरे जप्त
PM

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत रूळांवर फिरणाऱ्या जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येते. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत रूळांवर फिरणारी ४१७ जनावरे जप्त करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. दरम्यान, रूळांवर भटकी जनावरे आढळल्यास संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश विभागीय पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

रेल्वे रूळांवर किंवा रेल्वेच्या हद्दीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोकाट फिरणारी जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येते. मध्य रेल्वेने रूळांवर वावरणाऱ्या जनावरांच्या संख्या कमी करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणे अंमलात आणली आहेत. ज्या ठिकाणी व विभागांचे सखोल विश्लेषण, सामुदायिक शिक्षण व समुपदेशन, कुंपण बांधणे आणि इतर विविध उपाययोजनांचा समावेश आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ४६८ प्रकरणांच्या तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ मध्ये संख्या ४१७ आढळल्याने ही संस्था ५१ ने झाली आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एकूण ४१७ प्रकरणांपैकी मुंबई विभागात ७० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही संख्या ९३ एवढी होती. भुसावळ विभागातून चालू वर्षात ९४ प्रकरणे तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ११० प्रकरणे निदर्शनास आली होती. नागपूर विभागात २२५ विरुद्ध २११ प्रकरणे आहेत.  एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पुणे विभागात १८ प्रकरणे तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २० प्रकरणे नोंदवण्यात आली होती. तसेच यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सोलापूर विभागातून २४ प्रकरणे नोंदवली गेली, तर मागील २०२२ ह्या वर्षी याच कालावधीत एकूण २० प्रकरणे नोंदवली गेली होती.

शिटी मारणे, समुपदेशन उपयुक्त!

रेल्वे विभाग, विशेषत: रेल्वे सुरक्षा दल आणि अभियांत्रिकी विभागाच्या समन्वयित प्रयत्नांचे आहे. नियमित शिट्टी वाजवणे, अन्न-कचरा विल्हेवाट करण्याच्या योग्य सूचना, ग्रामस्थांचे समुपदेशन, रेल्वे मार्गिका साफ करणे, कुंपण बांधणे, स्टेशन कर्मचारी तैनात करणे, आणि जागरूकता मोहीम इत्यादी उपायांची अंमलबजावणी करण्यात वरील बाबींचा मोठा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in