भेसळयुक्त दुधाची विक्री करणार्‍यांना अटक

चौकशीसाठी शाहूनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.
भेसळयुक्त दुधाची विक्री करणार्‍यांना अटक

भेसळयुक्त दुधाची विक्री करणार्‍या सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सैदुल खारिंग, कोमरेल्ली बोब्बाली, व्यकंन्ना यालगाबोईना, निरसिंम्हा बोईना, कृष्णा जांगिले आणि नागेश मंद्रा अशी या सहा जणांची नावे असून अटकेनंतर या सर्वांना पुढील चौकशीसाठी शाहूनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले. अटकेनंतर सहाही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

घडले काय?

शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ए. के गोपाळनगर परिसरात एक टोळी भेसळयुक्त दुधाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा टाकला असता एका झोपडीत सहा जण नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करताना सापडले. घटनास्थळाहून पोलिसांनी विविध कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या, १०१० लिटर भेसळयुक्त दूध, प्लास्टिक नरसाळे आदी ६० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in