
मुंबई : रंगपंचमीच्या दिवशी क्षुल्लक कारणावरून शर्ट फाडला म्हणून अरबाज शेख या १९ वर्षांच्या तरुणावर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या कटातील दोन वॉण्टेड आरोपींना साकीनाका पोलिसांनी अटक केली. रविंद्र रामवचन यादव आणि मनिषकुमार नवच्छेद शर्मा अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांसोबत या गुन्ह्यांत आशू बाबूलाल यादव, अवधेश खंजाटी यादव, रोहित उदल यादव, सोनू यादव, संजीत संतलाल यादव, हरिंदर गजराज यादव, रोहित छोटेलाल यादव असे सातजण सहआरोपी आहेत.