फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक 

या खातेदारांची शेअरची मुदत संपली आहे किंवा त्यांनी त्यांच्या शेअरवर अद्याप दावा केला नव्हता. अशाच खातेदारांना टार्गेट करुन त्यांची फसवणूक करण्यात आली होती.
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक 

मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस शुक्रवारी मुंबईतील राष्ट्रीय विमानतळावरुन आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अरविंद बाबूलाल गोयल असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने गुरुवार २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा दुसरा सहकारी विनय वखारिया हा फरार असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या दोघांनी पाच खातेदारांच्या सुमारे दहा कोटीच्या शेअरची परस्पर विक्री करून या पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. बोरिवली परिसरातील एका खाजगी कंपनीत तक्रारदार लिगल विभागात उपाध्याक्ष म्हणून काम करतात. ही कंपनीत शेअर ट्रेडिंगसंदर्भात काम करते. ते त्यांच्या खातेदारांना खरेदी-विक्रीसाठी डिमॅट खात्यासह ट्रेडिंग अकाऊंट प्लेटफॉर्म उपलब्ध करून देण्यास मदत करते. त्यांच्या कंपनीच्या पाच खातेदारांच्या अनक्लेम शेअरची माहिती काढून नंतर त्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करुन सुमारे दहा कोटी रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते.

या खातेदारांची शेअरची मुदत संपली आहे किंवा त्यांनी त्यांच्या शेअरवर अद्याप दावा केला नव्हता. अशाच खातेदारांना टार्गेट करुन त्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी ते खातेदारांच्या कंपनीचे सभासद असल्याचा दावा केला होता. त्यांच्या नावाने बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून डिमॅट खाते उघडले होते. त्यानंतर विविध बँकेत खाते उघडून १० कोटी २७ लाख रुपये ट्रान्स्फर करण्यात आले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच कंपनीच्या वतीने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in