दोन कोटींच्या ड्रग्जच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

अटकेनंतर इम्रानला गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटला सोपविण्यात आले आहे.
दोन कोटींच्या ड्रग्जच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

मुंबई : दोन कोटींच्या ड्रग्जच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली. इम्रान शोएब खान असे या आरोपीचे नाव असून, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईदरम्यान इम्रान हा पळून गेला होता. अटकेनंतर इम्रानला गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटला सोपविण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने शिवडी परिसरात कारवाई करून सलीम हारुण राशिद खान या आरोपीस अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी दोन कोटी चार लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईनंतर या कटातील मुख्य आरोपी असलेला इम्रान खान हा पळून गेला होता. त्यामुळे त्याचा गुन्हे शाखेकडून शोध सुरू होता. शोधमोहीम सुरू असताना पोलीस पथकाने ड्रग्जच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या इम्रान खानला अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in