मुंबईत दहशतवादी घुसल्याचा दावा करणाऱ्याला अटक; मद्यधुंद अवस्थेत केला होता कॉल

अधिक तपास केल्यावर तपासाअंती या व्यक्तीने दारुच्या नशेत कॉल केल्याचं उघड झालं.
मुंबईत दहशतवादी घुसल्याचा दावा करणाऱ्याला अटक;  मद्यधुंद अवस्थेत केला होता कॉल

मुंबई पोलिसांना धमक्यांचे फोन येणं नित्याचं झालं आहे. रविवारी पुन्हा एकादा अशीच एक घटना घडल्याने खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रविवारी(२६ नोव्हेंबर) रोजी एका मद्यधुंद व्यक्तीने फोन केला. या व्यक्तीने दावा केला की, मुंबईत काही दहशतवादी घुसले आहेत. या कॉलनंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहिम सुरु केली. या कॉलच्या दृष्टीने अधिक तपास केल्यावर तपासाअंती या व्यक्तीने दारुच्या नशेत कॉल केल्याचं उघड झालं.

या मद्यपी व्यक्तीने मुंबईत दोन ते तीन दहशतवादी घुसले असून मानखुर्दमधील एकतानगर येथे आले असल्याचं सांगितलं. हे दहशतवादी काहीतरी योजना आखत असल्याची बनावट माहिती देखील या व्यक्तीने दिली. या व्यक्तीने दिलेली माहिती चुकीची असून हा कॉल फसवा असल्याचं मुंबई पोलिसांना आढळून आलं.

या व्यक्तीने दारुच्या नशेत पोलिसांना कॉल केला. लक्ष्मण ननावरे असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो सध्या कोठडीत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केली असून अधिक तपास सुरु केला आहे. आयपीसीच्या कलम १८२ आणि ५०५ (१) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in