मानखुर्दमध्ये बोगस नोटांची छपाई करणाऱ्याला अटक

सोनापूरमध्ये डुक्कर चाळ असून या चाळीतील एका रुममध्ये रोहित शहा नावाचा एक तरुण बोगस नोटांची छपाई करीत
मानखुर्दमध्ये बोगस नोटांची छपाई करणाऱ्याला अटक

बोगस नोटांची छपाई करणाऱ्या रोहित मनोज शहा या २२ वर्षांच्या तरुणाला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ७ लाख १६ हजार १५० रुपयांच्या बोगस नोटांसह दोन लाख रुपयांचे छपाईचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मानखुर्द येथील ज्योर्तिलिंग नगर, सोनापूरमध्ये डुक्कर चाळ असून या चाळीतील एका रुममध्ये रोहित शहा नावाचा एक तरुण बोगस नोटांची छपाई करीत असल्याची माहिती पोलीस शिपाई केदार आणि मीर यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांच्या पथकातील राजू सुर्वे, आदिनाथ गावडे, दिपक दळवी, मीर, सोनावणे, दरेकर, केदार, शिंदे, शेंडे आणि कदम यांनी तिथे छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांना रोहित हा दोनशे, शंभर आणि पन्नास रुपयांच्या बोगस नोटांची छपाई करताना रंगेहाथ सापडला. घटनास्थळाहून पोलिसांनी दोनशे, शंभर आणि पन्नास रुपयांच्या ७ लाख १६ हजार १५० रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या. तसेच नोटा बनविण्यासाठी लागणारे लॅपटॉप, कलर प्रिंटर, कलर बॉटल, कागद असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in