पारंपरिक पद्धतीने घरोघरी गौराई मातेचे आगमन

दारात आलेल्या गौराईची पूजा करून घरातल्या सुवासिनींनी तिचे स्वागत केले.
पारंपरिक पद्धतीने घरोघरी गौराई मातेचे आगमन

गणपतीबाप्पाचे आगमन झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते माहेरवाशीण असलेल्या गौराई मातेच्या आगमनाचे. शनिवारी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने घराघरांत गौराईचे आगमन झाले. ज्येष्ठागौरी आवाहनानिमित्त घरोघरी गौराईची भक्तिभावाने पूजा करण्यात आली.

शनिवार सकाळपासूनच घरोघरी गौराई आगमनाची लगबग सुरू होती. सुहासिनींनी वाजतगाजत गौराईला घरी आणले. दारात आलेल्या गौराईची पूजा करून घरातल्या सुवासिनींनी तिचे स्वागत केले. त्यानंतर शालू, पैठणी यासह विविध अलंकार परिधान करून गौराईचा श‌ृंगार केला. घरात विधिवत पूजन, आरती करून वैविध्यपूर्ण पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. आता रविवारी गौरीपूजनानंतर सोमवारी गौरीविसर्जन करण्यात येईल. कोकणातील अनेक गावांमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने गौराईचा पाहुणचार केला जातो. यावेळी गौराईला भाजी-भाकरीचा, गोडाचा नैवेद्य, फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक गावांमध्ये गौरीला तिखटाला म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्यही दाखवला जातो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in