बॉम्बे आर्ट सोसायटीत आर्ट कार्निव्हल प्रदर्शनाला सुरुवात

या पहिल्या आर्ट कार्निव्हलमध्ये ३२ कलाकारांच्या एकूण १०४ कलाकृतीं मांडण्यात आल्या आहेत. कलादर्शक, कला लेखक आणि कला खरेदीदार व कलावंत यांच्यात थेट संवाद
बॉम्बे आर्ट सोसायटीत आर्ट कार्निव्हल प्रदर्शनाला सुरुवात

बॉम्बे आर्ट सोसायटी यावर्षापासून आर्ट कार्निव्हल ही चार प्रदर्शनांचा समावेश असलेली नवी कलाप्रदर्शन मालिका सुरु करत आहे. १५ ते २३ ऑगस्ट दरम्यान आर्ट कार्निव्हलची पहिली आवृत्ती होत आहे. सदर आर्ट कार्निव्हलचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी प्रसिध्द चित्रकार व अंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते पार पडले. या पहिल्या आर्ट कार्निव्हलमध्ये ३२ कलाकारांच्या एकूण १०४ कलाकृतीं मांडण्यात आल्या आहेत. कलादर्शक, कला लेखक आणि कला खरेदीदार व कलावंत यांच्यात थेट संवाद सुरू करणे हा आर्ट कार्निव्हलचा उद्देश आहे. बरेच कलाकार कलेच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतात, त्यांना मुख्य प्रवाहात आणून मुंबईच्या कलाजगतात त्यांना व त्यांच्या कलेला स्थान मिळावे असा प्रयत्न सोसायटीकडून केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in