'आर्ट व्हिजन'चे पु.ल. देशपांडे कला अकादमीत ११ वे समुह प्रदर्शन

'आर्ट व्हिजन' या कला समूहातर्फे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन १३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत रसिकांना रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे.
'आर्ट व्हिजन'चे पु.ल. देशपांडे कला अकादमीत ११ वे समुह प्रदर्शन

सुप्रसिद्ध चित्रकार व चित्रकलेचे विद्यार्थी यांच्या विविधांगी कलाकृती दर्शवणारे एक भव्य सामूहिक कला प्रदर्शन मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे आयोजित करण्यात आले आहे. 'आर्ट व्हिजन' या कला समूहातर्फे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन १३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत रसिकांना रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे.

या कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण ३३ कलाकारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने कलाशिक्षक, कलाध्यापक, प्रथितयश चित्रकार, कलेचे विद्यार्थी यांचा या प्रदर्शनात सहभाग आहे. या चित्र प्रदर्शनाचे आयोजन प्रमुख उद्देश विविध कलांना व कलाकारांना प्रोत्साहन देणे असा आहे. या प्रदर्शनाचे आयोजन अर्जुन माचीवले, महेश कदम व रियाज काझी, जावेद मुल्ला यांनी केले आहे. प्रस्तुत प्रदर्शनात सहभागी झालेल्या कलाकारांना राजा रवि वर्मा पुरस्कार २०२३ देण्यात येणार आहे. कलेचा विकास व्हावा, तळागाळात कला पोहोचावी व सर्व स्तरावरील कलाप्रेमींना यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सुरू केलेल्या 'आर्ट व्हिजन' हे त्या शृंखलेतील ११ वे सामूहिक कलाप्रदर्शन आहे.

या कला प्रदर्शनात सहभागी कलाकारांची ॲक्रिलिक रंग, जलरंग, मिक्स मीडिया वगैरेमध्ये साकारलेली विविधांगी चित्रे ठेवण्यात येणार आहेत. त्यात मुख्यतः निसर्गचित्रे, अमूर्त शैलीतील कलाकृती, शहरी व ग्रामीण जीवनशैली व सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवणारी चित्रे, ऐतिहासिक वास्तु व गौरवशाली परंपरा यांचे वैशिष्ट्यपूर्ण व अनोखे सादरीकरण, भारतीय संस्कृतीविषयी विशेष व विविध परंपरा व रितीरिवाज दाखवणारी चित्रे, भावपूर्ण व्यक्तिचित्रे वगैरे साकारणारी बहुआयामी भावपूर्ण चित्रे ठेवण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in