मुंबई: पारशीवाडी मित्र मंडळ अर्थात आर्थर रोडचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढा हा देखावा साकारला आहे. मराठी भाषा व मराठी भाषेचे अस्तित्व टिकवणे या विषयाला अनुसरून देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे कागदाच्या लगद्यापासून गणेशाची मूर्ती बनवली आहे.
आर्थर रोडचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच देखाव्याच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असते. या वर्षी संयुक्त महाराष्ट्र या विषयावर देखावा साकारण्यात आला आहे. यंदाचा देखावा कला दिग्दर्शन डॉ. सुमित पाटील यांनी साकरला असून पराग पारधी यांनी पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती साकारली आहे.
आदिवासी पाड्यांना मदतीचा हात
मंडळांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. त्यात आदिवासी पाड्यात राहणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते, अशी माहिती आर्थर रोडचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस अतुल देसाई यांनी दिली.