

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. दादर, लालबाग परळसह क्रॉफर्ड मार्केटमध्ये पूजेच्या साहित्यासह सजावटीचे साहित्य खरेदीसाठी भक्तांची गर्दी उसळली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात कापडी फुलं, कपड्याच्या लड्या, जास्वंदीची फुलं, पानं, चिनी बनावटीच्या फुलांना मागणी असून ती गणेश भक्तांच्या पसंतीस उतरली आहेत. कापडी फुलं, चिनी बनावटीची एक डझन फुले ४० ते ५० रुपयांत उपलब्ध आहेत. क्रॉफर्ड मार्केटमध्ये मुंबईच नव्हे, तर पालघर, रायगड, पनवेल या ठिकाणाहून लोक खरेदीसाठी दरवर्षी क्रॉफर्ड मार्केटमध्ये येत असतात, असे दुकानदारांनी सांगितले.
गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले की बाजारपेठांना नवे रंग चढतात. क्रॉफर्ड मार्केटमध्ये येत असतात, असे दुकानदारांनी सांगितले.
गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले की बाजारपेठांना नवे रंग चढतात. यंदा विशेषतः मुंबईत कृत्रिम फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. पारंपरिक ताज्या फुलांच्या माळा, तोरणे आणि सजावटीच्या वस्तूंच्या जोडीने आता कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. घरगुती गणेश मुर्ती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात कृत्रिम फुलांच्या वापराला पसंती दिली आहे.
ताजी फुले काही तासात कोमेजतात, परंतु कृत्रिम फुले संपूर्ण उत्सव काळात ताजीतवानी तर दिसतातच पण एकदा खरेदी केल्यानंतर पुढील वर्षीही त्यांचा पुनर्वापर करता येतो. क्रॉफर्ड मार्केट, लालबाग, दादर, परळ आदी बाजारपेठांमध्ये विविध रंगीबेरंगी कृत्रिम फुलांच्या माळा, हार, तोरणे उपलब्ध आहेत. पाश्चात्य शैलीतील गुलाब, ट्युलिप, ऑर्किड्स यांसोबत पारंपरिक झेंडू, मोगरा आदी फुलांची मागणी अधिक असून ३० रुपये डझन ते चीनी बनावटीची फायकत पती ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, असे कोमल ट्रेंड्स या दुकानातील कामगारांनी सांगितले. एकंदरीत, पर्यावरणपूरक व टिकाऊ सजावटीची आवड वाढत असल्याने या वर्षी मुंबईतील गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा गंध अधिकच दरवळणार असेच दिसते.
... म्हणून कृत्रिम फुलांचा पर्याय
कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या विक्रीवर परिणाम होतो. मात्र उत्सव काळात खरेदीसाठी होणारी गर्दी, वाहतूक व फुलांची देखभाल यांचा विचार करता कृत्रिम फुलांचा पर्याय अधिक उपयुक्त ठरतो, असे कोकणातील गणेश भक्त सुनील पावसकर यांनी सांगितले.