अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी जामीनावर बाहेर; नागपूर कारागृहातून १७ वर्षांनी सुटका

तब्बल १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर कुख्यात गुंड अरुण गवळी बुधवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आले.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी जामीनावर बाहेर; नागपूर कारागृहातून १७ वर्षांनी सुटका
छायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई: तब्बल १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर कुख्यात गुंड अरुण गवळी बुधवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आले.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने खून प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र २८ ऑगस्ट रोजी न्या. एम. एम. सुंदरेश आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने आदेश देताना नमूद केले की, गवळी १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. त्यांचे अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

कारागृह विभागाच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गवळी दुपारी सुमारे १२.३० वाजता तुरुंगाच्या बाहेर आला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

logo
marathi.freepressjournal.in