Arun Gawli : अरुण गवळींनी का पाठवली अ‍ॅमेझॉन, व्हॉईस मीडियासह 'डिस्कवरी'ला नोटीस?

अरुण गवळी (Arun Gawli) यांनी अ‍ॅमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरीला कायदेशीररित्या नोटीस पाठवली आहे
Arun Gawli : अरुण गवळींनी का पाठवली अ‍ॅमेझॉन, व्हॉईस मीडियासह 'डिस्कवरी'ला नोटीस?
@discoveryplusIN
Published on

नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'मनी माफिया' या डिस्कवरीवरील वेब सिरीजमध्ये अरुण गवळी (Arun Gawli) यांच्याबद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण करण्यात आल्या प्रकरणी अ‍ॅमेझॉन, व्हॉईस मीडियासह डिस्कवरी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अरुण गवळी यांचे वकील आशिष पाटणकर आणि प्रतीक राजोपाध्ये यांच्यातर्फे ही नोटीस पाठवण्यात आली.

अरुण गवळी यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हंटले आहे की, 'मनी माफिया' या वेब सिरीजमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करण्याआधी परवानगी घेतली नसल्याचा दावा केला आहे. अ‍ॅमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरी यांनी बिनशर्त माफी मागावी. याशिवाय अरुण गवळी यांचा उल्लेख काढून टाकावा, अशी मागणी नोटीसद्वारे करण्यात आली आहे. अरुण गवळी पॅरोलवर - मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आले होते. त्यांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी वकिलामार्फत अ‍ॅमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरीला कायदेशीर नोटीस पाठवली.

logo
marathi.freepressjournal.in