
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "उद्धव ठाकरे हा वाघाचा मुलगा आहे. ते लढत असलेली लढाई जिंकणारच. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ. " अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात आणला ते कौतुकास्पद होते." असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. ते म्हणाले की, "देशामध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई असून ती वाढतच चालली आहे. काही उद्योगपतींच्या भल्यासाठी केंद्र सरकार देशाला वेठीस धरत आहे. आम्हाला एकमेकांच्या विरोधात लढायचे नाही तर, सोबत मिळून काम करायचे आहे."