विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

तपासात हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि केअरटेकर अशा चौघांविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच या चारही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई : गार्डनमध्ये उघड्यावर ठेवलेल्या वायरमधून शॉक लागून आर्यवीर अजय चौधरी या ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी सोसायटीच्या चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

३५ वर्षांचे तक्रारदार गोरेगाव येथे राहत असून, एका विमा कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी ९ एप्रिलला त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा आर्यवीर हा त्याच्या मित्रासोबत सोसायटीच्या तळमजल्यावरील गार्डनमध्ये खेळत होता. यावेळी गार्डनमधील इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून तो बेशुद्ध झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या लाइफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. तपासात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी लोखंडी पाइपवर फुटलेला पांढऱ्या रंगाचा लाइट लावला होता. विजेचा पुरवठा करणाऱ्या वायरला जॉईन करून उघड्या अवस्थेत निष्काळजीपणाने ती वायर ठेवण्यात आला होता. त्यातून विद्युत पुरवठा होऊन आर्यवीरला शॉक लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता.

तपासात हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि केअरटेकर अशा चौघांविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच या चारही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in