चार दिवसांत २३०० कोटींच्या मालमत्ता करवसुलीचे टेन्शन

आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठवल्यानंतर दिलेल्या कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन केले जात आहे. आतापर्यंत २ हजार २१३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
चार दिवसांत २३०० कोटींच्या मालमत्ता करवसुलीचे टेन्शन

मुंबई : उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीत यंदा घट होण्याची शक्यता आहे. १ एप्रिल २०२३ ते २७ मार्च २०२४पर्यंत २ हजार २१३ कोटी रुपये करवसुली पूर्ण झाली आहे. २०२३-२४ मध्ये ४५०० हजार कोटी रुपये मालमत्ता करवसुलीचे मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र आतापर्यंत २ हजार २१३ कोटी रुपये वसूल झाल्याने पुढील चार दिवसांत उर्वरित २,३०० कोटींच्या करवसुलीचे पालिकेसमोर आव्हान उभे ठाकले आहे. मुंबईकर नागरिकांनी ३१ मार्च २०२४ पर्यंत मालमत्ता कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हा पालिकेचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. त्यामुळे पालिकेकडून जास्तीत जास्त करवसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी मोठ्या मालमत्ता धारकांकडे पालिकेने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्‍या उद्दिष्टाइतका मालमत्ता कर संकलनाकामी विविध प्रकारे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठवल्यानंतर दिलेल्या कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन केले जात आहे. आतापर्यंत २ हजार २१३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. सध्या करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी देखील प्राधान्य देण्यात येत आहे.

‘टॉप टेन’ मालमत्ता धारकांची यादी

  • एस विभाग : राजेश बिजनेस लिजर्स हॉटेल प्रा. लि. – ४९ कोटी १२ लाख ३३ हजार ५४१ रुपये

  • जी दक्षिण विभाग : कमला मिल्‍स् लिमिटेड जॉईन्‍ट स्‍टॉक कंपनी - २० कोटी ८४ लाख १९ हजार ६३१ रुपये

  • एच पश्चिम विभाग : सिंधुकुमार वाय मेहता - ९ कोटी ५८ लाख ९५ हजार ९०८ रुपये

  • एच पश्चिम विभाग : गॅलेक्‍सी कॉर्पोरेशन - ८ कोटी ८५ लाख ९२ हजार ३८७ रुपये

  • के पश्चिम विभाग : मोहीत कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी - ८ कोटी ७९ लाख २५ हजार ९८० रुपये

  • जी दक्षिण विभाग : गौरव इन्‍वेस्‍टमेंट – ८ कोटी ५८ लाख ७३ हजार ५३६ रुपये

  • जी दक्षिण विभाग : न्‍यू सन मिल्‍स् कंपनी लिमिटेड – ८ कोटी २३ लाख १३ हजार ६५९ रूपये

  • डी विभाग : ए. आर. जाफर – ६ कोटी ३३ लाख २६ हजार ४२६ रुपये

  • जी दक्षिण विभाग : अंबिका सिल्‍क मिल्‍स् कंपनी लिमिटेड – ५ कोटी ६३ लाख ७ हजार ८९ रुपये

  • डी विभाग : स्‍टर्लिंग इन्‍वेस्‍टमेंट – ४ कोटी ५७ लाख ७९ हजार ८७६ रुपये

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in