दुग्धजन्य पदार्थ महाग होण्याची शक्यता,कर पाच टक्क्यांवर जाणार

नुकत्यात झालेल्या जीएसटीच्या ४७व्या बैठकीत काही पदार्थांवरील करसवलत मागे घेण्यात आली आहे.
 दुग्धजन्य पदार्थ महाग होण्याची शक्यता,कर पाच टक्क्यांवर जाणार

सध्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेबाहेर असलेले दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांवरील सवलत बंद करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतल्यामुळे आता दूध, दही तसेच लस्सी आणि ताक या पदार्थांसहित काही खाद्यपदार्थ आणि तृणधान्ये महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गहू, तृणधान्यांचे पीठ तसेच गुळ आणि दुग्धजन्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे लवकरच दूध, दही, लस्सी महागणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्यात झालेल्या जीएसटीच्या ४७व्या बैठकीत काही पदार्थांवरील करसवलत मागे घेण्यात आली आहे. “दही आणि लस्सीवरील शून्य टक्के असलेला कर आता पाच टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आल्यामुळे उत्पादक कंपन्या वाढीव खर्च हा पदार्थांच्या किंमती वाढवून तो ग्राहकांकडूनच वसूल करणार आहेत. दूध कंपन्यांसाठी महसूलाच्या बाबतीत दही हा प्रमुख पदार्थ असून दही आणि लसी हे एकूण १५ ते २५ टक्के महसूल मिळवून देत आहेत, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in