पाच महिन्यात तब्बल १२ प्रवाशांना मोटरमन्सच्या सतर्कतेमुळे जीवदान

लाइफलाइनपुढे उभे राहत अनेक प्रवासी मानसिक तणावाखाली येत आत्महत्येचा प्रयत्न करतात.
पाच महिन्यात तब्बल १२ प्रवाशांना मोटरमन्सच्या सतर्कतेमुळे जीवदान
Published on

उपनगरीय रेल्वे मार्गावर दिवसागणिक अपघाताच्या घटना घडतात. रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करूनही अपघातांचे प्रमाण घटलेले नाही. अशातच मध्य रेल्वेवरील मोटरमन्सच्या सतर्कतेमुळे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल १२ प्रवाशांना जीवदान मिळाले आहे.

रेल्वे म्हणजे मुंबईकरांची लाइफलाइन; मात्र याच लाइफलाइनपुढे उभे राहत अनेक प्रवासी मानसिक तणावाखाली येत आत्महत्येचा प्रयत्न करतात. तर काही नागरिक पादचारी पुलाचा वापर न करता रूळ ओलांडत ये-जा करतात; मात्र रेल्वेच्या वेगापुढे हे बेजबाबदार प्रयत्न जीवघेणे ठरत आहेत. अशा अनेक घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला अशा प्रवाशांच्या हालचाली टिपत मध्य रेल्वे मार्गावरील मोटरमन्सने सतर्क राहत अनेक प्रवाशांचे जीव वाचवले आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत रेल्वे वाहतूक करणाऱ्या मोटरमन्सकडून तब्ब्ल १२ प्रवाशांचे जीव वाचवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. चिंचपोकळी स्थानकात प्रवेश करताना दिसला. त्याने ट्रॅकच्या मध्यभागी उडी मारली आणि ट्रेनसमोर उभा राहिला. त्यावेळी त्यांनी तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली त्यामुळे त्याचा जीव वाचला.

n २७ ऑगस्ट रोजी मुंबई विभागाचे मोटरमन एस. व्ही जाधव हे सीएसएमटी- ठाणे येथे काम करत असताना एक मुलगी चिंचपोकळी-भायखळा अप लोकल मार्गादरम्यान रुळावर येताना दिसली. त्याने लगेचच काही फूट आधी ट्रेन थांबवून मुलीचा जीव वाचवला. त्यांनी ट्रेन मॅनेजरला याची माहिती दिली. नंतर आरपीएफ कर्मचार्‍यांनी त्या मुलीला ट्रॅकवरून काढले.

n २८ ऑगस्ट रोजी मुंबई विभागाचे मोटरमन जी एस बिस्ट हे टिटवाळा-सीएसएमटी लोकलवर काम करत असताना अंदाजे ५५ ते ५६ वर्षे वयोगटातील एक महिला दिवा-ठाणे धीम्या मार्गावर ट्रॅकच्या मध्यभागी येऊन उभी राहिली. जीएस बिस्ट यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावले आणि महिलेच्या काही मीटर आधी ट्रेन वेळेत थांबवली आणि तिचा जीव वाचवला. त्याने तिला दोन महिला प्रवाशांच्या मदतीने रुळावरून हटवले.

n ३१ ऑगस्ट रोजी मुंबई विभागाचे मोटरमन संजय कुमार चौहान यांनी ठाणे-अंबरनाथ लोकलवर काम करत असताना एक व्यक्ती ट्रेनच्यासमोर रुळावर पडलेली पाहिली. त्यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावला आणि गाडी थांबवली. पुढच्या काही मिनिटात तो माणूस उठला आणि ट्रॅकवरून निघून गेला.

ऑगस्टमधील घटना

१९ ऑगस्ट रोजी मुंबई विभागाचे मोटरमन राम शब्द हे अंबरनाथ-सीएसएमटी ट्रेनमध्ये काम करत असताना त्यांना एक १९-२० वर्षीय मुलगा

logo
marathi.freepressjournal.in