डबल डेकर बसेसचे BEST उपक्रमाचे नियोजन फसले; ७०० बसेसचा पुरवठा करण्यास कंत्राटदाराचा नकार

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३ हजार १० बसेसचा ताफा आहे. हा ताफा वाढविण्यासाठी बेस्टने फेब्रुवारी २०२२ मध्ये तत्कालीन बेस्ट समितीत ७ हजार बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र ७०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यास कॉसिस कंपनीने नकार दिला आहे.
डबल डेकर बसेसचे BEST उपक्रमाचे नियोजन फसले; ७०० बसेसचा पुरवठा करण्यास कंत्राटदाराचा नकार
Published on

मुंबई : स्विच मोबॅलिटी कंपनी २०० तर कॉसिस कंपनी ७०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करणार होती. मात्र कॅसिस कंपनीने ७०० पैकी एकाही बसेसचा पुरवठा न केल्याने बेस्ट उपक्रमाला प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचण निर्माण झाली आहे. बसेसची अपुरी संख्या यामुळे प्रवाशांनाही बस थांब्यावर तासन‌्तास बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागते, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे.‌ दरम्यान, स्विच मोबॅलिटी कंपनीने २०० पैकी ४९ बसेसचा पुरवठा केला आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३ हजार १० बसेसचा ताफा आहे. हा ताफा वाढविण्यासाठी बेस्टने फेब्रुवारी २०२२ मध्ये तत्कालीन बेस्ट समितीत ७ हजार बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र ७०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यास कॉसिस कंपनीने नकार दिला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या बसेसची संख्या अपुरी पडत असल्याने प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचण निर्माण झाली आहे.

बेस्ट बसेसचा प्रतीक्षा कालावधी ३० ते ६० मिनिटांपर्यंत गेला आहे, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना घाम पुसत तिष्ठत उभे राहावे लागत आहे. बेस्ट प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. बस पुरविण्यात असफल ठरलेल्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे तसेच बस पुरवठ्यात नकार देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेस्ट समितीचे माजी सदस्य रवी राजा यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in