BLO नियुक्तीस ४,००० आशासेविकांचा विरोध; मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचा आक्षेप

आगामी निवडणुकीसाठी बूथ लेवल ऑफिसर म्हणून आशासेविकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. आशा सेविका पालिकेचे कर्मचारी नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. तरीही ४,५०० आशासेविकांना बीएलओ म्हणून काम करण्याची बळजबरी केली जाते...
BLO नियुक्तीस ४,००० आशासेविकांचा विरोध; मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचा आक्षेप
BLO नियुक्तीस ४,००० आशासेविकांचा विरोध; मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचा आक्षेप प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : आगामी निवडणुकीसाठी बूथ लेवल ऑफिसर म्हणून आशासेविकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. आशा सेविका पालिकेचे कर्मचारी नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. तरीही ४,५०० आशासेविकांना बीएलओ म्हणून काम करण्याची बळजबरी केली जात असून प्रशासनाच्या दबावामुळे एका आशासेविकेचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. तिच्या कुटुंबियांना न्याय देण्याचे दूर उलट आशासेविकांना बळजबरीने बीएलओचे काम करण्यास भाग पाडले जात आहे. भविष्यात आशासेविकांबाबत काही घडले तर त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने दिला आहे.

सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका व पालिकेच्या आशासेविकांना बूथ लेवल ऑफिसर म्हणून नेमणूक करू नये. आशासेविका या पालिकेच्या कर्मचारी नाही, त्यामुळे बीएलओ म्हणून त्या नेमणुकीस पात्र नाहीत. तसेच निवडणूक आयोगाने बीएलओ नेमणूकसाठी दिलेल्या यादीमधील १३ संवर्गमध्ये त्यांचा हुद्दा नाही. तरी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती देऊन बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तरीही आशासेविकांचा चुकीच्या पद्धतीने बीएलओ निवडीला विरोध असून पालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांना निवेदन देण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in