
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. राज्यात भाषा विचारून चोपतात. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी इंग्रजीत शिकले असा खुलासा राज ठाकरे यांनी केला. लालकृष्ण अडवाणी इंग्रजीत शिकले, पण त्यांनी हिंदीला विरोध केला का, असा पलटवार मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर केला. राज ठाकरे यांचे शनिवारचे भाषण हे अपूर्ण होते, असा टोला शेलार यांना लगावला. तर उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे सत्ता गेल्याची तडफड होती, असा टोला मंत्री शेलार यांनी लगावला.
राज्यात शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसे व ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधानंतर राज्य सरकार नरमले अशी टीका करत ५ जुलै रोजी विजयोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले. विजयोत्सवात ठाकरे बंधू एकत्र येणार यासाठी वरळीतील डोममध्ये तुफान गर्दी झाली होती. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर मंत्री आशिष शेलार यांनी मनसे व शिवसेनेवर पलटवार केला आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू धर्म विचारून गोळ्या घातल्या. इथे हे लोक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतात, यांच्यात काय फरक आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. भाजप सत्तेत मोठा भाऊ आहे. त्यामुळे आम्ही संयमाने घेत आहोत, असे आशिष शेलार म्हणाले. दोन कुटुंब एकत्र आले याचा आम्हाला आनंद होईल, असेही मंत्री शेलार म्हणाले.
राज ठाकरे यांचे भाषण अपूर्ण होते, तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता गेल्याचे दुःख दिसून आले, असे शेलार म्हणाले.