
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आता सनदी अधिकाऱ्यांच्या नवीन नेमणुकांचा सिलसिलाही सुरू झाला आहे. पंतप्रधान कार्यालयातील कामकाजाचा अनुभव असलेले सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांची कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी, तर मुख्याधिकारी अजीज शेख यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातील कामकाजाचा अनुभव असलेले सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २००१ या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले परदेशी हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर परदेशी हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात रुजू झाले होते. आता ते उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून राज्यात परतले आहेत.