मतदान करा, जागरूक नागरिक व्हा! सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवणार; अश्विनी जोशींची माहिती

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काही पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. तर काही पक्षांकडून लवकरच उमेदवार जाहीर होतील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४साठी मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे.
मतदान करा, जागरूक नागरिक व्हा! सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवणार; अश्विनी जोशींची माहिती
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सोसायटी, इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. पालिकेचा आरोग्य विभाग, मालमत्ता कर विभाग, अनुज्ञापन विभाग या विभागातील अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी मतदानाविषयी जनजागृती मोहीम राबवणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काही पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. तर काही पक्षांकडून लवकरच उमेदवार जाहीर होतील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४साठी मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानात मुंबईतून मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. सोसायटी, इमारतीत, स्लम एरियात आरोग्य, अनुज्ञापन, मालमत्ता कर विभागातील अधिकारी व कर्मचारी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादरीकरण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून योग्य ती तयारी झाली आहे. मुंबईत मतदानाचा टक्का वाढीसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कशाप्रकारे जनजागृती मोहीम राबवण्यात येते, याबाबत पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी ५ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादरीकरण करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in