मुंबई : आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट म्हणून इतिहास रचणाऱ्या सुरेखा यादव या या महिन्याच्या अखेरीस ३६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
यादव यांनी १९८९ मध्ये भारतीय रेल्वेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी त्या सहाय्यक चालक बनल्या आणि आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालकाचा मान मिळवला. सातारा जिल्ह्यात जन्मलेल्या यादव यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण करून रेल्वेत प्रवेश केला आणि पुरुषप्रधान क्षेत्रात पायऱ्या चढत पुढे गेल्या.
१९९६ मध्ये त्यांनी मालगाडी चालवली. २००० पर्यंत त्या मोटरवुमन बनल्या. दहा वर्षांनी त्यांनी घाट विभागात गाड्या चालवण्याची पात्रता मिळवली आणि नंतर मेल व एक्स्प्रेस गाड्यांची जबाबदारी सांभाळली.