दिवाळीपूर्वी नेत्यांना आरक्षणाबद्दल विचारा! जरांगे-पाटील यांचे आवाहन

मराठा कोट्याबाबत कालबद्ध कृती आराखडा घेऊन सरकारी शिष्टमंडळ जरांगे-पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेणार होते
दिवाळीपूर्वी नेत्यांना आरक्षणाबद्दल विचारा!
जरांगे-पाटील यांचे आवाहन

मुंबई : दिवाळी मेजवानीमध्ये जाण्यापूर्वी आपल्या राजकीय नेत्यांना मराठा नेत्यांनी आरक्षणाबद्दल सवाल करावा, असे आवाहन कार्यक्रम मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे.

राज्यात सर्व राजकीय पक्षांकडून दिवाळी मेजवान्यांचे आयोजन केले जात असून त्या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांनी या नव्या आवाहनाने मराठा समाजाचे लक्ष वेधले आहे. ‘‘राजकीय नेत्यांपासून सावध राहा. तुम्ही त्यांनी आयोजित स्नेहभोजनासाठी जात असाल तर त्यांना मराठा कोट्याबद्दल विचारा. त्यांना मराठा कोट्याच्या समर्थनार्थ बोलायला सांगा. अशा कार्यक्रमांपेक्षा तुमच्या मुलांचे भविष्य महत्त्वाचे आहे," असे सांगून जरांगे-पाटील म्हणाले की, ‘‘पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात सर्व आमदार मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलतील याची खात्री करा.’’ असे त्यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील बोलत होते.

कुणबी जातीच्या नोंदीबाबत बोलताना जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रातील राजघराण्यांकडे असलेल्या जुन्या नोंदीही स्कॅन कराव्यात, अशी सूचना केली. "त्यांच्यामध्ये कुणबी जातीच्या अधिक नोंदी असू शकतात. राजघराण्यांनी त्यांचे रेकॉर्ड सरकारी समिती आणि खासगी विद्वानांना छाननीसाठी उघडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठा कोट्याबाबत कालबद्ध कृती आराखडा घेऊन सरकारी शिष्टमंडळ जरांगे-पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेणार होते. मात्र, आजपर्यंत अशी बैठक झालेली नाही. आम्ही त्यांची वाट पाहू आणि भविष्यातील कृतीचा निर्णय घेऊ, असे जरांगे-पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in