१४ वर्षांच्या मुलावर हल्ला; आरोपीस अटक

१४ वर्षांच्या मुलावर हल्ला; आरोपीस अटक

रागाच्या भरात त्याने झिशानवर धारदार वस्तूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
Published on

मुंबई : साकीनाका येथे राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याप्रकरणी समीर मोहम्मद शाह ऊर्फ बादशाह याला साकीनाका पोलिसांनी अटक केली. इंस्टाग्रामचा पासवर्ड सांगितला नाही, म्हणून त्याने झिशान अजाज अहमद कुरेशी या मुलावर हल्ला केला होता. अजाज वाहिद कुरेशी हे साकीनाका परिसरात राहत असून, त्यांचा झिशान हा मुलगा असून, गुरुवारी २८ डिसेंबरला रात्री अकरा वाजता तो त्याच्या मोबाईलवर यूट्यूब बघत होता. याच दरम्यान तिथे समीर शहा आला. त्याने त्याच्याकडे त्याच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड मागितला; मात्र त्याने पासवर्ड सांगण्यास नकार दिला. रागाच्या भरात त्याने झिशानवर धारदार वस्तूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

logo
marathi.freepressjournal.in