कॉलेजकुमारीवर अत्याचार; नौदल अभियंत्याला अटक

ही बाब आरोपीच्या पत्नीला समजल्यानंतर तिने तिला त्याच्याशी बोलू नकोस किंवा संबंध ठेवून नकोस, अशी सक्त ताकीद दिली होती.
कॉलेजकुमारीवर अत्याचार; नौदल अभियंत्याला अटक

कुलाबा येथे १९ वर्षांच्या कॉलेज तरुणीवर तिच्याच परिचित मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच नौदल इंजिनिअर आरोपीस कफ परेड पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित तरुणी ही १९ वर्षांची असून, ती एका खासगी कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ती सध्या कुटुंबियांसोबत कुलाबा येथील कारंजा, तुनीरच आयएनएसमध्ये राहते. दोन वर्षांपूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती. ही बाब आरोपीच्या पत्नीला समजल्यानंतर तिने तिला त्याच्याशी बोलू नकोस किंवा संबंध ठेवून नकोस, अशी सक्त ताकीद दिली होती. रविवारी ती तिच्या मैत्रिणीकडे जात असताना तिला आरोपी भेटला. काही वेळानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाइल लोकेशन शेअर केले होते. त्यानंतर ती आरोपीसोबत सरकारी निवासस्थानात गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिने तिच्या मैत्रिणीसह कुटुंबियांना ही माहिती सांगितली. त्यानंतर तिने कफ परेड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. पत्नी गावी गेल्याची संधी साधून आरोपीने पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in