चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला

याप्रकरणी आरोपी पती हेमंत मारुती मसुरेकर (४५) याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला

मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर पतीनेच प्राणघातक हल्ला केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात ४२ वर्षांची श्रद्धा हेमंत मसुरेकर ही महिला गंभीररीत्या जखमी झाली असून, तिच्यावर सत्यम रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी आरोपी पती हेमंत मारुती मसुरेकर (४५) याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. श्रद्धा ही मूळची पुण्याची रहिवाशी असून, सध्या ती तिच्या पती हेमंतसोबत घाटकोपर येथील पंतनगर, बेस्ट कॉलनीत राहते. पंधरा वर्षांपूर्वी तिचे हेमंतसोबत विवाह झाला होता. तिला बारा वर्षांची एक मुलगी आहे. पुण्यातील एका बँकेत ती कामाला आहे. हेमंत हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. त्यामुळे तिने त्याच्यासोबत विभक्त राहण्याचा निर्णय घेत त्याला घटस्फोटाची नोटीस पाठविली होती. मात्र तो तिला घटस्फोट देण्यास तयार नव्हता. १६ सप्टेंबरला ती मावस बहिणीच्या साखरपुडा असल्याने पुण्यातून पती आणि मुलीसोबत घाटकोपर येथील घरी आली होती. साखरपुडा कार्यक्रम संपल्यानंतर ते तिघेही सोमवारी १८ सप्टेंबरला पुण्याला जाणार होते. मात्र पुण्याला जाण्यावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी हेमंतने पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या वाद घालण्यास सुरुवात केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in