दिंडोशी मतदारसंघासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही; महायुतीतील जागावाटप होण्याआधीच मतदारसंघावर दावा

महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्पष्ट केले. मात्र विधानसभा मतदारसंघांतील जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे समोर आले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्पष्ट केले. मात्र विधानसभा मतदारसंघांतील जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. दिंडोशी मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आग्रही आहे. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात पक्षाचे वर्चस्व असल्याचे सांगत येथून उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दिंडोशी तालुका अध्यक्ष विलास घुले यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्या असून उमेदवार निश्चितीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत बैठकीचे सत्र सुरू आहे. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र २८८ विधानसभा मतदारसंघांत महायुतीतील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून वर्चस्व असलेल्या विधानसभा पेट स मतदारसंघांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीबाबत वेळीच योग्य निर्णय नाही. न घेतल्यास पक्षांतर्गत बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी'

गेल्या विधानसभा निवडणुकीत दिंडोशी विधानसभेत राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच जवळपास ३८ हजार मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या माध्यमातून या मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जनतेचा कौल राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटप करताना दिंडोशी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळावी, अशी आग्रही मागणी असल्याचे विलास घुले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in