मुंबईत पोलीस अधिकाऱ्याने केली आत्महत्या, बदलीच्या टेन्शनमुळे उचलले टोकाचे पाऊल?

मुंबईच्या सांताक्रूझ पूर्व येथे वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी राहत्या घरी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Pralhad Bansode Suicide Case
Pralhad Bansode Suicide Case
Published on

मुंबईच्या सांताक्रूझ पूर्व येथे वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी राहत्या घरी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रल्हाद बनसोडे (42) असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि निकामी पथकात ते संलग्न होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बनसोडे यांनी कलिना येथील पोलीस वसाहतीच्या ( इमारत क्र. टी-५ ) नवव्या मजल्यावरील पॅसेजच्या छताला गळफास लावून जीवन संपवलं. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ते राहत होते. बनसोडे यांनी आत्महत्या केली, तेव्हा त्यांचे कुटुंबिय घरातच होते. वाकोला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

सोसायटीच्या चौकीदारीने बनसोडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. बनसोडे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. पण, ते मूळ जळगावचे होते आणि तेथे बदलीसाठी प्रयत्नशील होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती नाही.

logo
marathi.freepressjournal.in