सिद्धीविनायक मंदिरात ‘जय श्रीराम’चा जयघोष; राहुल शेवाळेंच्या वतीने स्वच्छता मोहीम

अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे.
सिद्धीविनायक मंदिरात ‘जय श्रीराम’चा जयघोष; राहुल शेवाळेंच्या वतीने स्वच्छता मोहीम

मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तास उरले असताना प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात आणि वडाळा येथील विठ्ठल मंदिरात ‘जय श्रीराम’च्या जयघोषात स्वच्छता मोहीम पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्त्वात ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर यांसह पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे. या निमित्ताने देशभरातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळांवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. याला प्रतिसाद देत खासदार शेवाळे यांनी शुक्रवारी सकाळी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात आणि मंदिर परिसरात साफसफाई करून सेवा केली. तसेच, प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात देखील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in