

मुंबई : न्हावा-शिवडी अटल सेतू प्रकल्पबाधित, वंचित मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी एका महिन्यात सर्वे करत अहवाल सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. शासनाने २०१९ पर्यंतची डेड लाईन दिली होती. मात्र त्यानंतरही पाणजे, घारापुरी ही गावे नुकसान भरपाईपासून वंचित राहिली आहेत. प्रकल्पबाधित मच्छीमारांना न्याय देण्यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेत वंचित राहिलेल्या गावांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश बनसोडे यांनी दिले आहेत.
न्हावा-शिवडी अटल सेतू प्रकल्पबाधित मच्छीमारांच्या नुकसान भरपाई बाबत विधानभवनात उपाध्यक्षांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत मत्सव्यवसाय, पदुम व एमएमआरडीए विभागाचे अधिकारी उपस्थित होते.