अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या 'शिवडी - न्हावाशेवा अटल सेतू'च्या वापराकरिता पथकरात पन्नास टक्के -सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यातआला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली आहे.
अटल सेतू
अटल सेतूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या 'शिवडी - न्हावाशेवा अटल सेतू'च्या वापराकरिता पथकरात पन्नास टक्के -सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यातआला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, इलेक्ट्रीक मोटारकार, बसेस यांनाही 'अटल सेतू'च्या पथकरातून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे ई-व्हेईकल्सधारक तसेच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने ४ जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापराकरिता पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पथकर सवलत आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांकरिता एकेरी प्रवासाचा पथकर दरही निश्चित करण्यात आला.

एकेरी प्रवासासाठी असे आहेत दर

  • मोटर, जीप, व्हॅन, हलके मोटार वाहन : २५० रुपये, २०० रुपये, ५० रुपये

  • हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन, मिनी बस : ४०० रु., ३२० रु., ८० रु.

  • ट्रक अथवा बस (दोन आसांचे) ८३० रु., ६५५ रु., १७० रु.

  • तीन आसांचे व्यावसायिक वाहन : ९०५ रु., ७१५ रु., १८५ रु.

  • अवजड बांधकाम यंत्रसामग्री, जमीन खोदाई यंत्रसामग्री, अधिक आसांचे वाहन १,३०० रुपये, १,०३० रुपये, २७० रुपये.

  • अति अवजड वाहन, सात अथवा त्यापेक्षा अधिक आसांचे वाहन १,५०० रुपये, १,२५५ रुपये, ३२५ रुपये

logo
marathi.freepressjournal.in