चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेच्या शिपायाचा बालिकेवर अत्याचार, कांदिवलीतील धक्कादायक घटना

कांदिवली पूर्व येथील अशोक नगर परिसरातील एका नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या मुलीवर ४० वर्षीय शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेच्या शिपायाचा बालिकेवर अत्याचार, कांदिवलीतील धक्कादायक घटना

मुंबई : कांदिवली पूर्व येथील अशोक नगर परिसरातील एका नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या मुलीवर शाळेच्याच ४० वर्षीय शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला वॉशरूममध्ये नेत शिपायाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

घरी परतल्यानंतर तिला वेदना होऊ लागल्या. आईने याविषयी विचारणा केल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी शिपायाला अटक केली आहे. IPC च्या ३७६ कलमान्वये आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in