बोरिवलीत एटीएसची धडक कारवाई; दिल्लीहून आलेल्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या, बंदुकांसह जिवंत काडतुसे जप्त

बोरिवलीतील एका गेस्ट हाऊसवर काही लोक लपून बसले असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
बोरिवलीत एटीएसची धडक कारवाई; दिल्लीहून आलेल्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या, बंदुकांसह जिवंत काडतुसे जप्त

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या(ATS) मुंबई युनिटने धडक कारवाई केली आहे. एटीएसने मुंबईतील बोरिवली परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकत सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बोरिवलीतील एका गेस्ट हाऊसवर काही लोक लपून बसले असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्वजण हे दिल्ली येथील रहिवासी आहेत. हे लोक दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले होते? त्यांचा काही घातपात करण्याचा हेतू होता का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एटीएसकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in