ॲॅमेझॉनच्या डिलीव्हरी बॉयवर हल्ला; आरोपीला अटक

आज तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्याने त्याच्यावर चार ते पाच वाजता कोयत्याने वार केले
ॲॅमेझॉनच्या डिलीव्हरी बॉयवर हल्ला; आरोपीला अटक

मुंबई : ॲॅमेझॉनच्या डिलीव्हरी बॉयवर हल्ला करून पळून गेलेल्या एका आरोपीला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. रोहित बाळकृष्ण जाधव असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह गंभीर दुखापत आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यात जखमी झालेल्या मुस्तफिजुर रेहमान लियाकतअली याच्यावर मालाडच्या बालाजी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. मुस्तफिजुर रेहमान लियाकतअली हा गोरेगाव येथे राहत असून ॲॅमेझॉनमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. कौटुंबिक वादावरून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. रविवारी दुपारी एक वाजता मुस्तफिजुर हा त्याच्या मित्रांसोबत गोरेगाव येथील सॅटेलाईट एलिगन्स इमारतीसमोर अप्पा मारत होता. यावेळी तिथे रोहित आला आणि त्याने काही कळण्यापूर्वीच कोयता काढून मुस्तफिजुरच्या डोक्यात वार केला. आज तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्याने त्याच्यावर चार ते पाच वाजता कोयत्याने वार केले. ही माहिती समजताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

logo
marathi.freepressjournal.in