महानगरपालिका पथकावर हल्ला; सात जणांना अटक

या कारवाईला विरोध करून या जमावाने जप्त केलेले साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता.
महानगरपालिका पथकावर हल्ला; सात जणांना अटक
Published on

मुंबई : महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला करून शासकीय वाहनाचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सात जणांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. आबू रियायुद्दीन अफर अन्सारी, मोहम्मद हासिब सुब्राती शेख, गुफरात मेहताब खान, हफुजी रेहमान नासीर खान, सत्यप्रसाद रामपत गुप्ता, मोहम्मद आतिक इद्रीस शेख आणि मस्तान इस्तियाक खान अशी या सात जणांची नावे आहेत. त्यांच्यावर दंगलीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुंबई शहरात सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेलवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी मनपाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. संबंधित पथक सायंकाळी कांदिवलीतील लालजीपाडा इथे असलेल्या हॉटेलवर कारवाई करत होते. ही कारवाई सुरू असताना तिथे १० ते १५ जणांचा एक जमाव आला. या कारवाईला विरोध करून या जमावाने जप्त केलेले साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता.

logo
marathi.freepressjournal.in