25 कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न - समीर वानखेडेंची अटक तुर्तास दिलासा

अटकेची कारवाई न करण्याचे आदेश 5 सप्टेंबर पर्यंत कायम
Sameer Wankhede
Sameer Wankhede

मुंबई :कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडून 25 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला एफआयआर दाखल केल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला दिलासा कायम ठेवला. वानखेडे यांनी याचिकेत दुरूस्ती केल्यानंतर या प्रकरणी साँलीसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत. त्यामुळे सिबीआयने न्यायालयाकडे वेळ मागितल्याने खंडपीठाने याचिकेची सुनावणी 5 सप्टेंबरला निश्‍चित केली.

.कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला सोडून देण्यासाठी समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान कडून कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा,अशी विनंती करीत वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांग्रे आणि न्यामूर्ती राजेंश पाटीले यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी वानखेडे यांच्यावतीने अ‍ॅड. आबाद पोंडा यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या एफआयआरच्या वैधतेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले. वानखेडे अर्थ मंत्रालयातर्गत असलेल्या विभागाचे कर्मचारी असल्याने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यापूर्वी अर्थ खात्याची परवानगी बंधनकारक आहे. तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अन्वये लाच देणार्‍यावरही खटला चालवला पाहिजे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. यावेळी सीबीआयने असा मुद्दा उपस्थित केला .

logo
marathi.freepressjournal.in